
पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत उंच राष्ट्रध्वज सांगलीत
सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सांगली रेल्वे स्थानक परिसरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. सन २०१८ मध्ये कामास प्रारंभ झाला. दोन वर्षांपासून ध्वज डौलाने फडकतोय. काही महिन्यांपूर्वी ध्वज खराब झाल्याने बदलण्याचा निर्णय झाला होता. नवा ध्वज प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी ध्वजवंदन करण्यात आले. मिरजेतील जंक्शन मोठे असले, तरी उंच तिरंगा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी स्थानकात उभारण्याची योजना होती. त्यामुळे तो सांगलीत उभारण्यात आला.
कोल्हापूर व सातारा स्थानकांतील ध्वजस्तंभांची उंची १०२ फूट आहे. सांगली व पुण्यातील स्थानकांत त्यापेक्षा १८ फूट जास्त म्हणजे १२० फूट उंचीवर तिरंगा फडकविण्यात आला आहे. जोरदार हवा व पावसामुळे तो वारंवार खराब होतो. एक ध्वज सरासरी चार ते सहा महिनेच टिकतो. सांगलीत नव्याने उभारणी झाली, तेव्हा एकाचवेळी पाच ध्वज मिळाले होते. ते सर्व खराब झाल्याने नव्याने मागणी करण्यात आली होती. ध्वजासाठीचे कापड परदेशातून आयात केले जाते. भारतात शिवणकाम केले जाते. ध्वजस्तंभाची उंची १२० फूट आहे. ध्वजाची लांबी २१ फूट, तर रुंदी १८ फूट आहे. त्याची किंमत सुमारे ४५ हजार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतून देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांच्या रेल्वे स्थानकांवर मोठ्या उंचीचा तिरंगा फडकाविण्याची योजना राबविण्यात आली. सांगली स्थानकात २०१८ मध्ये काम सुरू झाले. २०२० मध्ये प्रत्यक्ष उभारणी झाली. यासाठी सुमारे पाच लाखांचा खर्च आला. केंद्राकडून हा निधी प्राप्त झाला होता. पश्चिम महाराष्ट्रात हा सर्वांत उंच ध्वजस्तंभ आहे.
-विवेककुमार पोद्दार स्थानक अधीक्षक, सांगली
Web Title: Western Maharashtra Allest National Flag 120 Feet Flagpole
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..