पोलिस उपनिरीक्षक पदासाठी 'क्या करे, क्या ना करे' अशी स्थिती

अक्षय गुंड 
सोमवार, 18 जून 2018

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दरवर्षी विविध पदासाठी अनेक परिक्षा घेतल्या जातात. अधिकारी व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून लाखो मुले स्पर्धा परिक्षा अभ्यास करतात. परंतु आयोगाच्या, कोर्टाच्या व मॅटच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्यचे वातावरण आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या २०१८ च्या पोलिस उपनिरीक्षक पदांची मुख्य परिक्षा आली तरी, समांतर आरक्षणांच्या मुद्यावर अद्याप २०१६ व २०१७ च्या पोलिस उपनिरीक्षक परिक्षेचा निकाल लागलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये 'क्या करे, क्या ना करे ये कैसी मुश्किल है'.? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती २०१४-१५ मध्ये झाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहीरात जवळपास अडीच-तीन वर्षांनंतर निघाली. पोलिस उपनिरीक्षक या पदाची २०१६ ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी २०१७ ची पण परीक्षा दिलेली आहे, सद्या अशी परिस्थिती आलेली आहे कि, पोलिस उपनिरीक्षक २०१६ ची मुलाखत दिलेल्या उमेदवारांनी २०१७ ची मुख्य परीक्षा दिलेली आहे, २०१६ व २०१७ ची परीक्षेचा निकाल प्रलंबित असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी परत २०१८ च्या पोलिस उपनिरीक्षक पदाची पुर्व परिक्षा दिलेली आहे. त्यामुळे तिन्ही परीक्षेत तेच-तेच विद्यार्थी उत्तीर्ण होतील. नवीन उमेदवारांना संधीच मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक २०१६ च्या निकालाची वाट पाहायची की, २०१७ च्या मैदानी परीक्षाची तयारी करायची का? येणाऱ्या २०१८ च्या मुख्य परीक्षेची तयारी करायची. असे अनेक प्रश्नांचा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात होत आहे. तेवढाच मनस्तापही होत आहे.

पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी निकालाअभावी तीन वेळा परीक्षा द्यावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचे वेळ वाया जात असुन, वय वाढत जात आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आपले सरकार या वेब पोर्टलवर तक्रार नोंदवून मुख्यमंत्र्यांना ट्वीट व ई-मेल केले आहेत. शासनाने गांभीर्याने विचार करून पोलिस उपनिरीक्षक पदाचा प्रलंबित निकाल तात्काळ जाहीर करावा. अशी मागणी विद्यार्थ्यांमधुन होत आहे.

पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र होऊनही निकाल प्रलंबित असल्याने विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदाची तिसरी जाहिरात आली तरी पुर्वीच्या परिक्षेचे निकाल लागला नसल्याने विद्यार्थ्यांना काय करावे हे सुचत नाही. शासनाने यात लक्ष निकाल का प्रलंबित आहे? याची कारणे शोधुन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.
- नितीन कदम, परिक्षार्थी

2016 च्या आधी 2 वर्ष पोलिस उपनिरीक्षक साठी कोणतीही जाहिरात आली नाही. त्यानंतर 2016 ला जाहिरात आली. त्यामुळे आम्ही रात्र दिवस अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक पदाची परिक्षा दिली. फिजीकल होऊन जवळ जवळ 9 महिने झाले तरी निकाल लावला जात नाही. त्यामुळे पुन्हा या पदासाठी साठी अभ्यास करत आहे. निकाल लवकर लागला तर पुढील दिशा समजण्यास मदत होईल. 
- सुनील खेडकर, परिक्षार्थी

निकालाची कोणतीही निश्चिता नसल्याने गावाकडे न जाता पुढील परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरात रहावे लागते. येथील महिन्याचा खर्च सरासरी ९००० हजार रुपयांच्या आसपास येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असुन शासनाने लक्ष देऊन पोलिस उपनिरीक्षक पदाचे निकाल जाहीर करावेत. 
- दिलीप पवार, परिक्षार्थी

Web Title: what to do and what not to do condition for police sub inspector post