esakal | मंगलाष्टकावेळी मोडलं लग्न, मग नवरदेव ढसाढसा रडला, नवरीही हिरमुसली
sakal

बोलून बातमी शोधा

What prevented her marriage

दोन दिवसांपासून मंडप बांधण्याचे काम सुरू होते. आज मंडप बांधून तयार झाला होता. सकाळीच जेवणाचेही पदार्थ तयार झाले होते

मंगलाष्टकावेळी मोडलं लग्न, मग नवरदेव ढसाढसा रडला, नवरीही हिरमुसली

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः  तुम्ही लग्न केले लावले तर गुन्हा दाखल करू. असे सांगताच मुलीचे वडीलांनी माघारी घेत विवाह थांबविला. मात्र, वऱ्हाडी मंडळी म्हणाली आता तयार केलेल्या या जेवणाचे काय करावयाचं... 

हेही वाचा - तृप्ती देसाईंना कोण मारायला टपलंय


मंडप बांधून तयार होता जेवणही तयार झाले होते पाहुणे मंडपात हळू हळू जमा होऊ लागले होते विवाहाची वेळ जवळ येत होती या बाबत माहीती अशी पारनेर तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय मुलीचे नगर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील मुलाशी आज दुपारी चार वाजून 10 मिनिटांनी सुपे येथे लग्न संमारंभ आयोजीत केला होता.

सगळी तयारी पाण्यात, वऱ्हाडही उपाशी

दोन दिवसांपासून मंडप बांधण्याचे काम सुरू होते. आज मंडप बांधून तयार झाला होता. सकाळीच जेवणाचेही पदार्थ तयार झाले होते. मात्र एका अल्पवयीन मुलीचा विवाह सुपे येथे होत असल्याची तक्रार चाईल्ड लाईनच्या मुंबई कार्यालयास समजली. त्यांनी सुपे पोलिसांशी संपर्क साधला. आज (ता. 16 ) सकाळीच पोलीस व चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते मंडपात पोहचले त्याच वेळी मुलीच्या वडीलाची तर पाचावर धारण झाली.

कष्ट पाण्यात...

व-हाडीमंडळी उपाशीपोटी तर नवरदेव मंडपात न येताच हिरमुसून निघून गेला. एक तर लग्न जमत नव्हतं, नवससायास करून जमवलं, पण तेही मोडल्याने त्याचे अश्रू थांबता थांबेना.गेली 15 दिवसापासून विवाहाच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. आज (ता. 16 ) सकाळी 10 वाजता साखपुडा नंतर हळद व त्या नंतर चार वाजून 10 मिनिटांनी लग्न सारी तयारी पुर्ण झाली होती. मंडपात व-हाडी मंडळी जमा होत असतानाच पोलीसही आहे आणि सारेच गणिीत विस्कटले.

आमचा काय गुन्हा

आम्ही काय गुन्हा केला अशी विचारणा सुरू झाली. त्यावर पोलीसांनी त्यांना तुम्ही तुमच्या मुलीचे वय कमी असताना तिचा विवाह करत आहात. तिचे विवाह योग्य वय नसताना विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यावेळी मुलीच्या वडीलांनी व व-हाडी मंडळींनी पोलीसांसमोर खूप गयावया केली. आम्ही पत्रिका वाटल्या आहेत. पाहुणे थोड्या वेळातच पोहचतील तसेच अाता मंडप बांधला आहे. जेवणही तयार झाले आहे. व-हाडी मंडळीही आली आहे. अाता लग्न होऊन जाऊ द्या. मात्र अाता या अल्प वयीन मुलीचे हे लग्न तुम्ही केले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल असे बजावताच आज होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला.

वधू-वरांच्या मामांचा जबाब

पोलिसांनी त्या नंतर मुलीचे वडील व मामा तसेच मुलाचा व मुलाला वडील नसल्याने त्याच्या भावाचा जबाब घेतला. त्यांच्याकडून आम्ही मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण झाल्यावरच हा विवाह करू असे लेखी घेऊन त्यांना समज देऊन त्यांना सोडून दिले. 

loading image