
आटपाडी : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या देशातील पहिल्या बंदिस्त पाईपलाईन पथदर्शी प्रकल्पातून उन्हाळी आवर्तनाचे पाणी द्यावे, अशी प्रतीक्षेतील शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र झालेल्या कामाची अद्याप चाचणीही झालेली नाही. त्यामुळे बंदिस्त पाईपलाईन चाचणीचा मुहूर्त काढून पाणी कधी देणार, असा सवाल प्रतीक्षेतील शेतकऱ्यांतून केला जात आहे.
टेंभू उपसा सिंचन योजनेचे सात वर्षापूर्वी तालुक्यात पाण्याने प्रवेश केला. टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लागल्यानंतर घाणंद, आटपाडी, अर्जुनवाडी, शेटफळे, बनपुरी, कचरेवस्ती, निंबावडे, दिघंची तलावात पाणी पोहचले. कालव्याची कामे पूर्ण नसल्यामुळे ओढ्या पात्रातून पाणी दिले. यामध्ये अनेक ठिकाणी समस्या आणि अडचणी निर्माण झाल्या. 2016 मध्ये शेतीला पाणी देण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन पथदर्शी प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली.
मुख्य कालव्यातून बंदिस्त पाईपलाईन वितरकेतून प्रत्येक गावागावात पाणी पोहोचवण्याचा आराखडा करून काम सुरू केले. डाव्या कालव्यावर दिघंची, निंबवडे, घरनिकी आणि झरे या चार वितरीका आहेत. पैकी दिघंची च्या झालेल्या कामाची चाचणी झाली आहे तर झरे आणि घरनिकी वितीरीकेचे काम पूर्ण होऊनही चाचणी झालेली नाही. चाचणी झाल्यास यातून पाचशे हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. खरसुंडी मुख्य कालव्यावर घाणंद, खरसुंडी आणि काळेवाडी वितरिका आहेत.
घाणंद वितरकेतून आटपाडी,मापटेमळा, देशमुखवाडी, यापावाडी, माडगुळे, मासाळवाडी, लेंगरेवाडी, बोंबेवाडी,भिंगेवाडी या भागात पाणी न पोहोचलेल्या किमान आडीच हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. तसेच बनपुरी, तडवळे,करगणी, काळेवाडी, तळेवाडी, बाळेवाडी, गोमेवाडी, पात्रेवाडी, शेटफळे भागातही अनेक ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात आउटलेट काढून ठेवली आहेत. त्याची ही चाचणी झालेली नाही. पाणी न पोहोचलेल्या भागातील शेतकऱ्यांची बंदिस्त पाईपलाईन मधून पाणी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे बंदिस्त पाईपलाईनचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात कधी पोहोचणार?, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कामे पूर्ण होण्याची प्रतिक्षा
बंदिस्त पाइपलाइनच्या दिघंची आणि निंबवडे वितरीकेचे अंतिम टप्प्यात काम आनेक दिवसापासून रेंगाळले आहे. अशीच परिस्थिती घाणंद आणि खरसुंडी वितरीकेची आहे. बहुतांश ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात असून अनेक दिवसापासून रेंगाळली आहेत.
एकीकडे झालेल्या कामाची चाचणी नाही तर दुसरीकडे अनेक दिवसापासून कामे ठप्प आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात खोदून ठेवलेल्या चरी तशाच आहेत. त्यामुळे रेंगाळलेली अंतिम टप्प्यातील बंदिस्त पाईपलाईनची कामे आणि झालेल्या कामाची चाचणीचा मुहूर्ता यावरून शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केला जात आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.