esakal | गुडेवारांविरुद्धचा शिस्तभंग प्रस्ताव कुठाय? सर्वसाधारण सभेतील मागणीला केराची टोपली

बोलून बातमी शोधा

Where is the disciplinary motion against Gudewar? A basket of bananas to demand at the general meeting}

सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी. त्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली होती.

गुडेवारांविरुद्धचा शिस्तभंग प्रस्ताव कुठाय? सर्वसाधारण सभेतील मागणीला केराची टोपली
sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी. त्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली होती. त्याला अद्याप प्रतिसाद का दिला नाही? तसा प्रस्ताव का पाठवला नाही, असा सवाल कॉंग्रेसचे पक्ष प्रतोद जितेंद्र पाटील यांनी केला आहे. 

ते म्हणाले,""चंद्रकांत गुडेवार यांची कामाची पद्धत ही सदस्यांचा अपमान करणारी आहे. ते अधिकारी कमी आणि राजकारणी जास्त झाले आहेत. त्यांनी सदस्यांना घरी घालवण्याचा डाव रचला होता. जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा प्रस्ताव हा अतिशय गंभीर स्वरुपाच्या षङयंत्राचा भाग होता. त्यात त्यांना यश आले नाही, मात्र सदस्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचला. आमच्या कामाविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला.

वास्तविक, कोणता ठराव कायदेशीर ठरेल आणि कोणता बेकायदा ठरेल, याची माहिती वरिष्ठांनी देणे अपेक्षित होते. तसे झाले नाही. हा गुडेवार यांनी केलेला टोकाचा प्रकार होता. त्याआधी जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा अपमान करणे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुणाची सत्ता पाडली आणि कुणाची आणली याबाबत उघड विधान करणे, डॉक्‍टरांच्या नेमणुका बेकायदा पद्धतीने करणे, कोरोना संकट असताना नेमणुकांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात गर्दी करणे आणि त्या गर्दीतील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे पुन्हा उघड होणे, हे गंभीर आहे. हा शिस्तभंगच आहे. त्याबाबतचा ठराव मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केला होता.'' 

ते म्हणाले,""सर्वसाधारण सभेत सदस्य आक्रमक होते. गुडेवार यांच्या कार्यशैलीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही बेकायदा कामे करा, असे म्हणत नाही. परंतु, साऱ्यांना चोर ठरवण्याचा सपाटा लावून सदस्यांना बदनाम करणे थांबले पाहिजे. त्यासाठी श्री. डुडी यांनी शिस्तभंगाचा प्रस्ताव त्वरित पाठवणे गरजेचे आहे. तो कोणत्या मुद्दांवर पाठवावा, हेही मी सभेत जाहीरपणे सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करणे, हाही सभेचा अवमान ठरत नाही का?'' 

संपादन : युवराज यादव