आरं, ही माणसं नेमकी गेली कुठं?

Well, where exactly have these men gone?
Well, where exactly have these men gone?
Updated on: 

नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या संचारबंदीमुळे नगरमधील रस्ते निर्मनुष्य असतात. जे काही चारदोन टवाळखोर रस्त्यावर येतात. त्यांचाही पोलिसांनी बंदोबस्त केला. रात्रीच्या वेळी तर रस्त्यांवर भयाण शांतता असते. अशा रस्त्यांवर आता फक्त त्यांचेच साम्राज्य आहे. कोणीही त्यांना हटकत नाही. हाकलत नाही. उलट, एखादा पायी अथवा वाहनावर जात असला, तर हे टोळके त्याच्यावर चाल करून जाते. मदतीला कोणीच नसल्याने, जिवाच्या आकांताने गाडी जोराने दामटण्याशिवाय पर्याय नसतो. पोलिसही या टोळक्‍याचे काहीच करू शकत नाहीत. इतके दिवस मागे लागलेली महापालिकाही त्यांचे काहीच करीत नाही.

टोळक्या टोळक्याने ते बसलेले असतात किंवा फिरत असतात.आरं ही माणसं नेमकी गेली कुठं... जणू काही ते आपसात चर्चा करीत असावीत. कोरोनाच्या भीतीने आणि पोलिसांच्या कारवाईने शहरातील रस्ते सुनेसुने झाले आहेत. 

शहरात रस्त्यांवर माणसे नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांचे चांगलेच फावले आहे. त्यांच्या टोळ्या शहरात निर्धास्त फिरतात. कधी कधी त्यांच्यातही टोळीयुद्ध रंगते. रस्त्याने कोणी जाताना दिसले, तर त्यास आडवे जातात. वाहनाच्या मागे लागतात. एकट्या-दुकट्यावर हल्ला करतात. शहरात असे प्रकार वाढत असून, मोकाट कुत्र्यांच्या दहशतीपुढे नगरकर हतबल झाला आहे. 

महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम कधीच बासनात गुंडाळून ठेवली. पिंपळगाव माळवी येथील महापालिकेचा कुत्रे निर्बीजीकरण प्रकल्प कित्येक दिवसांपासून बंद आहे. शहरातील मटणविक्रीच्या दुकानांजवळ तर मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री दिसून येतात. तेथील रक्तामांसाचा आस्वाद घेतात. रक्ताला चटावलेली ही कुत्री हिंसक होत असून, त्यांच्यापासून मोठा धोका होऊ शकतो. 

मोकाट कुत्र्यांचे अड्डे 
केडगाव मंदिर, मल्हार चौक, सक्कर चौक, चाणक्‍य चौक, कोठी परिसर, नालेगाव, अमरधाम परिसर, डाळ मंडई, सर्जेपुरा, लाल टाकी परिसर, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, मिस्कीन मळा आदी ठिकाणे मोकाट कुत्र्यांचे अड्डे बनले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com