झोपडपट्टी काढल्यानंतर राहायचे कुठे ?

किशोर आरबुणे 
Thursday, 22 October 2020

किर्लोस्करवाडी : रामानंदनगर (ता.पलूस) येथे बापूवाडीतील झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी आमिर (भैय्या) पठाण यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. रेल्वेच्या दुपदरीकरणामुळे अतिक्रमण काढण्याची नोटीस पुणे रेल्वे मंडलने पाठवली आहे. 

गरीबांचा संसार रस्त्यावर आला आहे. ते 40 वर्षापासून ते रामानंदनगरचे रहिवासी आहेत. मतदान कार्ड आणि शिधापत्रिका त्यांच्याकडे आहेत. ग्रामपंचायत या संकटांत चर्चासुध्दा करायला तयार नाही.

लॉकडाऊनमध्ये सामान्य मजुरांनी कोरोनाशी झुंज द्यावी की प्रशासनाशी असा प्रश्न आहे. झोपडपट्टी काढल्यानंतर ते राहणार कुठे ? त्यांना भाड्याने पण राहायला घर कोणी देत नाही. उदरनिर्वाह भटकंती करून चष्मे विकून होता. नवी पिढी सेंट्रींगवर गवंढ्याच्या हाताखाली कामाला जाऊन उदरनिर्वाह करीत आहे. 

आंदोलनकर्ते लक्ष्मण चव्हाण, नूर ईराणी, नेताजी इंगोले, निसार ईराणी, सादक ईराणी, वसंत माळी, विजय माळी, सुनील माळी, मोहन शिंदे, सौ. रेश्‍मा माने, सौ. सजिला ईराणी यांच्यासह झोपडपट्टीवासीय उपस्थित होते.

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where to live after slum removal?