बुडणाऱ्या मुलाला  वाचवताना मातेचाही अंत ः पहा कुठे 

नागेश गायकवाड 
Thursday, 10 September 2020

आटपाडी (सांगली) ः येथील सोमेश्वरनगर येथील शुक्र ओढा पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह तिचा दहा वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची धक्‍कादायक घटना घडली. राणी चंद्रकांत पारसे (वय 30) आणि मुलगा पृथ्वीराज ऊर्फ दादा चंद्रकांत पारसे (वय 10) असे वाहून गेलेल्या मायलेकाचे नाव आहे. पृथ्वीराजचा ओढा पात्रात पाय घसरल्याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या राणी यादेखील पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.

ही घटना गुरुवारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान घडली. दरम्यान राणी यांचा मृतदेह घटनास्थळापासून नजीकच सापडला. मुलाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. शोधकार्यासाठी सांगलीहून आठ बोटी मागवल्या आहेत. 

आटपाडी तालुक्‍यात चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आटपाडी तलाव टेंभूच्या पाण्याने तुडुंब भरल्याने हेच पाणी शुक्र ओढा पात्रातून सांगोला तालुक्‍यासाठी सोडले जाते. गेल्या आठ दिवसापासून पाऊस सुरू झाल्यामुळे आटपाडी तलावासाठी सोडलेले टेंभूचे पाणी बंद केले आहे. मात्र पुन्हा पाऊस झाल्यामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. गुरुवारी सोमेश्वरनगर येथील ओढ्यात राणी पारसे आपल्या मुलासह कपडे धुण्यासाठी साडे अकराच्या दरम्यान गेले होते. 

मुलगा पृथ्वीराज खेळता खेळता पाय घसरुन पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी राणी याही पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज त्यांना न आल्याने प्रवाहात दोघेही वाहून गेले. परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला.

मात्र दुपारपर्यंत ते सापडले नव्हते. दुपारी दोनच्या दरम्यान राणी पारसे यांचा मृतदेह घटनास्थळापासून थोड्या अंतरावर मिळून आला. पृथ्वीराजच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. वृषाली पाटील यांनी सांगलीशी तातडीने संपर्क करून आठ बोटी मागवल्याचे सांगितले. ओढा पत्रात नागरिकांनी जाऊ नये, काळजी घ्यावी असे आवाहन सौ. पाटील यांनी केले आहे. 

संपादन ः अमोल गुरव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where is the mother's heart while rescuing a drowning child?