कालव्यात गणपती विसर्ग करताना युवक वाहून गेला 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

जायगव्हाण (ता. कवठेमहांकाळ) येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात गणपती विर्सजना वेळी पाय घसरुन पडल्याने युवक वाहून गेला आहे.

शिरढोण (सांगली) ः जायगव्हाण (ता. कवठेमहांकाळ) येथे म्हैसाळ योजनेच्या कालव्यात गणपती विर्सजना वेळी पाय घसरुन पडल्याने युवक वाहून गेला आहे. पृथ्वीराज तुकाराम पाटील (वय 15) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी साडेबाराच्या सुमारास घडली. 

याबाबत समजलेली माहिती, अशी जायगव्हाण येतील तुकाराम पाटील यांची वस्ती म्हैसाळ कालव्यापासून काही अंतरावर आहे. पृथ्वीराज व त्याच्या लहानभाऊ असे दोघेजण म्हैसाळ कालव्यामध्ये गणपती विसर्जनसाठी गेले होते. दोघे भाऊ कालव्यात उतरले. प्लास्टिक बादलीमध्ये असलेली गणपतीची मुर्ती पाण्यामध्ये टाकत असताना हातातून बादली पाण्यात पडली. यावेळी बादली खाली वाकून पकडण्यासाठी प्रयत्न करीत असताना पाय घसरुन पडल्याने पाण्यात पडला. पाण्याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे तो वाहून गेला. अद्याप तो सापडला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While immersing Ganpati in the canal, the youth was carried away