पांढरे रेशनकार्ड धारकांनाही मिळणार आता मोफत उपचार 

white ration card.jpg
white ration card.jpg


सांगली ः राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोविड-19 बाधित, अबाधित रूग्णांचा समावेश केला आहे. राज्य सरकारने दोनच दिवसापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील शंभर टक्के लोकांना आता पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. देशात महाराष्ट्रातच ही सुविधा दिली जात आहे. सांगली जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. 


याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले की, पिवळे व केसरी रेशनकार्ड धारकांबरोबरच पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही त्याचा लाभ 31 जुलै 2020 पर्यंत होणार आहे. पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार नियुक्त केलेल्या सर्व हॉस्पिटलमध्ये मिळणार आहेत. 


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे कोविड-19 रूग्णांसाठी घोषित केले आहे. सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय येथे इतर रूग्णांवर नियमित उपचार सुरू आहेत. दोन्ही रूग्णालयांत रूग्णांना योजनेचा लाभ मिळत आहे. लाभार्थ्यांला रहिवासी पुरावा म्हणून वैध असेलेली पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसीलदारांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा सादर करावे लागेल. शासनमान्य फोटो ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक पासबूक, ड्रायव्हिंग लाइसेन्स इत्यादी (झेरॉक्‍स परवानगी फक्त कोविड पेशंटकरीता) यापैकी एक किंवा त्याची झेरॉक्‍स यांची आवश्‍यकता आहे. कोविड रूग्णांची सदर कागदपत्रे त्वरीत उपलब्ध नसल्यास कमीत कमी त्याचे मोबाईल वरील सुस्पष्ट फोटो सादर करावे. जेणेकरून सर्व रूग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळेल, असे डॉ. नणंदकर यांनी म्हटले आहे. 

सांगली जिल्हा 
केसरी कार्डधारक- 6 लाख 12 हजार 761 
शुभ्र कार्डधारक - सुमारे 1 लाख 7 हजार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com