जिल्हा परिषद अध्यक्षांचा कारभार चालवतंय कोण? : जितेंद्र पाटील

Who is running work of the President of Zilla Parishad? : Jitendra Patil
Who is running work of the President of Zilla Parishad? : Jitendra Patil
Updated on

सांगली : जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात काहीच बदल केलेला नाही, असे अध्यक्षा प्राजक्ता कोरे सांगत आहेत. प्रत्यक्षात समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे आणि वित्त व लेखा अधिकाऱ्यांनी मला फोन करून काही बदल केल्याचे सांगितले. जर हे बदल अध्यक्षांना माहितीच नसतील तर त्यांचा कारभार कोण चालवत आहे, असा सवाल कॉंग्रेसचे प्रतोद जितेंद्र पाटील यांनी केला. 


अंदाज पत्रकातील बदलावरून जितेंद्र पाटील यांनी अध्यक्षांवर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना प्राजक्ता कोरे यांनी पाटील यांची प्रसिद्धीसाठी धडपड सुरु असल्याचा आरोप करतानाच आम्ही अंदाजपत्रकात कोणताही बदल केला नसल्याचा खुलासा केला होता. श्री. पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. 


ते म्हणाले,""कायद्यानेच बोलायचे तर अर्थ समितीसमोर अंदाजपत्रक सादर करण्याआधी अध्यक्ष, सभापती, अधिकाऱ्यांची बैठक व्हायला हवी होती. ती झालीही असेल, मात्र एकदा का अर्थ समितीसमोर तो सादर झाला की त्यात बदल करणे योग्य नाही. परंतू, तसे झाले आहे. ते झाकून राहिलेले नाही. कारण जे बैठकीला होते, त्यांनीच मला फोन करून ही माहिती दिली.

त्यामुळे मी प्रसिद्धीसाठी काहीतरी करतोय, हा आरोप करण्यापेक्षा अध्यक्षांनी त्यांच्या अपरोक्ष त्यांचा अधिकार कोण वापरत आहे का, हे तपासून पहावे. त्या केवळ सहीसाठी आहेत, असे चित्र निर्माण होणे चांगले नाही. कारण, त्यांनी प्रोसेडिंग न वाचताच सही केल्यामुळे साठ सदस्यांच्या बरखास्तीची वेळ आली होती.'' 


ते म्हणाले,""माझा आक्षेप ग्रामीण विकासाच्या यंत्रणेत चुकीच्या प्रथा पडू नये, यासाठी आहे. कुणाशी व्यक्तीगत वाद नाहीत. चांगले करा, मात्र त्यासाठी कायद्याची मोडतोड कशाला करता? तुमचे अधिकारी आणि कर्तव्ये समजून घ्या. कसाही कारभार करावा आणि आम्ही तो बघत बसावा, असे होणार नाही.'' 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com