esakal | सांगलीचे पालकमंत्रीपद मिळणार कोणाला ?
sakal

बोलून बातमी शोधा

Who Will Be Sangli Guardian Minister

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत कुणाकडे कुठले खाते असणार, मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असणार, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. जयंत पाटील यांचे मंत्रिमंडळातील प्रमुख स्थान  मात्र निश्‍चित झाले आहे

सांगलीचे पालकमंत्रीपद मिळणार कोणाला ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - भाजप सरकारच्या काळात जिल्ह्याने पाच वर्षे उसना पालकमंत्री सहन केला. चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात फारसे लक्ष दिलेच नाही. आता मात्र जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळणार असून जयंत पाटील यांच्याकडेच ती धुरा येणार, हे स्पष्ट आहे. आघाडीच्या सत्ता काळात सतत नवी मुंबईचे पालकमंत्री राहिलेल्या जयंतरावांना आता आपल्या जिल्ह्याचा सुकाणू हातात घेण्याची संधी मिळणार आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत कुणाकडे कुठले खाते असणार, मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असणार, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. जयंत पाटील यांचे मंत्रिमंडळातील प्रमुख स्थान  मात्र निश्‍चित झाले आहे. गुरुवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा शपथ घेतली  ती जयंतरावांनी. त्यामुळे राष्ट्रवादीला जे प्रमुख पद मिळेल तर जयंतरावांचे असेल, असे संकेत मिळत आहेत. त्याअर्थाने ते उपमुख्यमंत्री होतील, अशीच अटकळ बांधली जात आहे.

हेही वाचा - रत्नागिरीतील या आमदारांना मिळणार मंत्रिपदे? 

त्यापलीकडे जावून त्यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी येणे जिल्ह्यासाठी अधिक महत्त्वाचे असणार  आहे. कारण, जिल्ह्याने युतीच्या काळात उसनवारीवर काम चालवले आहे. त्यातही चंद्रकांतदादा बरे होते, सुभाष देशमुख यांनी जिल्ह्याची पुरती निराशा करून टाकली होती. देशमुख यांनी जिल्ह्याला पुरेसा वेळ दिला नाही. महापुरासारख्या महासंकटातही त्यांचा प्रभाव दिसला नव्हता. त्यामुळे युतीची पुन्हा सत्ता आल्यावर मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद सुरेश खाडे यांना मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. तो डाव फसला, मात्र पालकमंत्री जिल्ह्याचेच असणार हे निश्‍चित आहे. 

हेही वाचा - शाहू मिलच्या जागेत हे विद्यापीठ व्हावे यासाठी जल आंदोलन 

राज्यात पंधरा वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या काळात पतंगराव  कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषवले. आर. आर. आबा, जयंत पाटील यांच्याकडे काही काळा पतंगराव कदम यांच्यापेक्षा महत्त्वाची खाती होती,  मात्र जिल्ह्याचे पालक म्हणून नेहमी पतंगरावांनी स्थान भूषवले आणि प्रभावी कामही केले होते. त्या काळात जयंतरावांकडे नवी मुंबईची, तर आबांनी  हट्टून गडचिरोलीची जबाबदारी घेतली होती.