यांनी पटकावला "महाकरंडक' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

फिरोदिया यांच्या उपक्रमाने नगरमधील कलाक्षेत्राला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद ठरतो,'' असे गौरवोद्‌गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले. 

नगरः ""रसिक नगरकरांवरील प्रेमापोटी उद्योजक नरेंद्र फिरोदिया व त्यांच्या परिवाराने अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा सुरू केली. नगरमधील कलाकारांना त्यामुळे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. फिरोदिया यांच्या उपक्रमाने नगरमधील कलाक्षेत्राला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद ठरतो,'' असे गौरवोद्‌गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले. 

निरूपण, ब्रह्मास्त्र प्रथम 
येथील अनुष्का मोशन पिक्‍चर्स अँड एंटरटेनमेंट प्रायोजित, महावीर प्रतिष्ठानातर्फे आयोजित आठव्या राज्यस्तरीय अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी (ता. 19) झाले. त्या वेळी आमदार जगताप बोलत होते. पुणे येथील रंगपंढरी संघाच्या "निरूपण' व मुंबईतील महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ब्रह्मास्त्र एकांकिकेस या स्पर्धेतील सांघिक प्रथम क्रमांकाचे बक्षीस विभागून मिळाले. सावेडी येथील माऊली सभागृहात झालेल्या अंतिम फेरीतील 29 एकांकिकांनंतर रविवारी रात्री उशिरा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. 

ए बास्टर्ड पॅट्रीअट 
मुंबईच्या दिशा थिएटर्स आणि ओंकार प्रॉडक्‍शनच्या "ए बास्टर्ड पॅट्रिअट' या एकांकिकेस द्वितीय पारितोषिक देण्यात आले. इचलकरंजी येथील "रंगयात्रा'च्या "मोठा पाऊस आला आणि...', तसेच कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्‍लबच्या "इट हॅपन्स'ला तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. 

मुक्ता बर्वेच्या हस्ते बक्षीस 
राज्यातील हौशी कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, हिंदी-मराठी अभिनेता-अभिनेत्रींच्या उपस्थितीत अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा पार पडली. महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, स्वप्नील मुनोत, अक्षय मुनोत आदींच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली. अभिनेत्री मुक्ता बर्वे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, अश्‍विन पाटील, नीलेश मयेकर स्पर्धेचे परीक्षक होते. 

हेही वाचा ः बापूसमर्थकांचं ठरलं, राजूदादांचं पितळ उघडं पाडणार 

51 हजारांचे पारितोषिक 
प्रथम क्रमांकाच्या एकांकिकांना 51 हजार रुपये व महाकरंडक, असे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत राज्यभरातून 110 संघ सहभागी झाले होते. त्यातील 30 संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले. 29 संघांनी प्रत्यक्षात सादरीकरण केले. प्रास्ताविक स्वप्नील मुनोत यांनी केले. प्रा. प्रसाद बेडेकर, ऍड. पुष्कर तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. अमोल खोले यांनी आभार मानले. 

स्पर्धेचा निकाल (सांघिक) 
प्रथम (विभागून) : निरूपण (रंगपंढरी, पुणे) व ब्रह्मास्त्र (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई). द्वितीय : ए बास्टर्ड पॅट्रिअट (दिशा थिएटर्स आणि ओंकार प्रॉडक्‍शन, मुंबई), 
तृतीय (विभागून) : मोठा पाऊस आला आणि... (रंगयात्रा, इचलकरंजी) व इट हॅपन्स (गायन समाज देवल क्‍लब, कोल्हापूर). चतुर्थ (विभागून) : भोकरवाडीचा शड्डू (सतीश प्रधान ज्ञान. महाविद्यालय, मुंबई) व सुंदरी (जिराफ थिएटर्स, मुंबई) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who win mahakarandak