..तर त्यांच्या मागे कोण फिरले असते? : विखे

..But who would have followed them?: vikhepatil
..But who would have followed them?: vikhepatil

संगमनेर, ता. :"युती सरकारने निळवंडे कालवे पूर्ण करण्याचे ठरविले आहे. आता तालुक्‍यात काय करायचे, तुम्ही ठरवा. कोणाच्या धमक्‍यांना घाबरण्याचे दिवस आता संपले. तालुक्‍याला पाणी दिले असते, तर शेतकरी सक्षम झाला असता; मग त्यांच्या मागे कोण फिरले असते? आश्वासनापलीकडे हा तालुका पुढे गेलाच नाही. तालुक्‍यात त्यांना साधा जलशुद्धीकरण प्रकल्पही आणता आला नाही; पण आता परिस्थिती बदलली आहे,'' अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
निमगाव भोजापूर येथे निळवंडे कालवा जलसेतूच्या कामाचे उद्‌घाटन विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राजापूर येथे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी पाणीप्रश्न समजून घेतला. आढळा, म्हाळुंगी नदीपट्ट्यातील पुराचे पाणी या नद्यांना मिळावे, या सुमारे 35 वर्षांपासूनच्या दुर्लक्षित मागणीकडे ऍड. श्रीराम गणपुले यांनी विखे पाटील यांचे लक्ष वेधले.
तो धागा पकडून थोरात यांच्यावर टीका करताना विखे पाटील म्हणाले, ""वर्षानुवर्षे पाण्याची वाट पाहणाऱ्या आढळा, म्हाळुंगी नदीकाठच्या 21 गावांना युती सरकारच पाणी मिळवून देईल. राज्यात पुन्हा युती सरकार येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. निळवंडे कालव्यांची कामे होतानाच आढळा, म्हाळुंगी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाने आतापासूनच नियोजन करावे.''
वसंत देशमुख डॉ. अशोक इथापे, राजेश चौधरी, सुधाकर गुंजाळ, गोकुळ लांडगे, भाऊसाहेब हासे आदी उपस्थित होते.

दीड वर्षात निळवंडे लाभक्षेत्राला पाणी
विखे पाटील म्हणाले, ""राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडला आहे. पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवून नगर, नाशिक व मराठवाड्याला देण्याचे धोरण युती सरकारने घेतले आहे. येत्या दीड वर्षात निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व सक्षम आहे.''
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com