मोहोळमध्ये पती- पत्नीने का केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

मोहोळ (जि. सोलापूर) : व्यवसायात येत असलेल्या अपयशामुळे आर्थीक विवंचनेला कंटाळून नैराश्येतुन पती- पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ येथे घडली आहे. 
श्रीशैल चंद्रकांत म्हेत्रे (वय ३२) व पत्नी स्नेहा श्रीशैल म्हेत्रे (वय २५) असे त्यांचे नाव आहे.

मोहोळ (जि. सोलापूर) : व्यवसायात येत असलेल्या अपयशामुळे आर्थीक विवंचनेला कंटाळून नैराश्येतुन पती- पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ येथे घडली आहे. 
श्रीशैल चंद्रकांत म्हेत्रे (वय ३२) व पत्नी स्नेहा श्रीशैल म्हेत्रे (वय २५) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार आत्महत्या केलेले श्रीशैल म्हेत्रे यांचे मुळ गाव अक्कलकोट तालकुक्यातील चपळगाव आहे. व्यवसायानिमीत्त मोहोळ येथील मदले मळा, गायकवाड वस्ती येथे ते आले होते. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई वडील, भाऊ, भाऊजय यांचे समवेत ते एकत्र राहत होते. श्रीशैल यांचे स्वत:  स्वामी समर्थ रेफ्रीजेशन हे फ्रिज दुरूस्तीचे दुकान होते. ते स्वत:च त्यात काम करीत होते. पण व्यवसाय व्यवस्थीत चालत नसल्यामुळे ते सतत तणावात असायचे. बुधवारी (ता. ८) सकाळी श्रीशेल यांच्या आई श्रीदेवी (वय ६५) मुलगा व सुन अजून कसे उठले नाहीत हे पाहण्यासाठी गेले. तेव्हा   त्यांनी आत्महत्याचे केल्याचे निदर्शनास आले. 
श्रीशैल व सुन स्नेहा यांनी साडीच्या साह्याने पत्रा शेडच्या लोखंडी पाईपला गळफास घेतल्याचे दिसुन आले, अशी फिर्याद मयत श्रीशैलचा भाऊ सिद्धाराम चंद्रकांत म्हेत्रे यांनी दिली. मयत श्रीशैल व स्नेहा यांना मुलगा शुभम ( वय ५) व मुलगी तंगी (वय ३) ही दोन अपत्ये आहेत. आर्थीक विवंचनेतुन आपल्या चिमुकल्या पाडसांचाही विचार न करता त्यांनी नैराश्येतुन अशा रितीने आपले जीवन संपविल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाडीवाले करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did husband and wife commit suicide in Mohol