इंदोरीकरांचा विषय कशाला वाढवता? दरेकरांचा सवाल 

Why raise the topic of Indore? Darekar's question
Why raise the topic of Indore? Darekar's question
Updated on

नगरः निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्या तोंडून अनवधानाने "ते' वाक्‍य निघून गेले. मात्र, तरीही ते समाजप्रबोधन करणारे कीर्तनकार आहेत. त्यांच्याकडून असे वाक्‍य निघायला नको होते. त्यांची चूक विसरून त्या वाक्‍याबद्दल नाहक विषय वाढवू नये, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. 

""महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या विचारधारेत भिन्नता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मुस्लिम आरक्षणाला समर्थन देतात, तर मध्येच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यासोबत अयोध्येत मशिदीला भेट देणार असल्याचे बोलतात. नाणार प्रकल्पाला सुरवातीला विरोध, तर आता पाठिंबा म्हणतात. ठाकरे द्विधा अवस्थेत दिसत आहेत. "राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मशिदीसाठी ट्रस्ट करण्याचे बोलतात, तर कॉंग्रेसचं तिसरच असतं,'' अशी टीका दरेकर यांनी आज आघाडी सरकारवर केली. 

औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. आमदार मोनिका राजळे, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे उपस्थित होते. दरेकर म्हणाले, ""अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे मागील व आजच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना देण्याची मागणी करणार आहोत.'' 


मनसेचे स्वागतच 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेला (एनआरसी) पाठिंबा दिला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही त्यांचे भाजपप्रमाणे एकमत आहे. मनसेसारखा समविचारी पक्ष भाजपसोबत आल्यास स्वागतच; मात्र याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे दरेकर म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com