Irwin Bridge : कृष्णा नदीच्या पुरात 'आयर्विन'वरून उडी मारावी की नको? जाणून घ्या मत-मतांतर..

आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ३० फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पाणी वेगाने वाहते आहे.
Irwin bridge in Krishna River flood
Irwin bridge in Krishna River floodesakal
Updated on
Summary

सांगलीच्या कृष्णामाईच्या पात्रामध्ये पोहणे, आयर्विन पुलावरून पुरात उड्या मारणे, हे नदीकाठी राहणाऱ्या तरुणांचे स्वप्न असते.

स्टंटबाजी करू नये

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पाऊस आणि धरणांतून विसर्ग सुरू झाल्यामुळे आता कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ३० फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पाणी वेगाने वाहते आहे. आजपासून कोयना धरणातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी वाढणार आहे.

अशा स्थितीत सांगलीतील आयर्विन पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या घेणारे तरुण दिसत आहेत. त्यांचा हा स्टंटबाजीचा प्रयत्न दिसतो आहे. तो धोकादायक ठरू शकतो. कारण, पाण्याचा अंत कुणालाच लागलेला नाही. पुलावरून ‘सेल्फी’ काढण्याचा प्रयत्न अनेक तरुण-तरुणी करताना दिसून येत आहे. असे केल्याने या तरुणांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

Irwin bridge in Krishna River flood
Kolhapur Flood : पंचगंगेची पातळी 41.9 फुटांवर.. कोल्हापूर-रत्नागिरी, बावडा-शिये मार्ग रात्री उशिरा बंद; कोणते मार्ग सुरू?

त्यामुळे तरुणांनी पोहायला जाऊन व ‘सेल्फी’च्या नादात धोका पत्करू नये. पाण्याचा वेग तीव्र असल्याने धोका अधिक आहे. यावर आळा घालण्यासाठी महापालिका, तसेच पोलिस प्रशासनानेही लक्ष घालून या ठिकाणी गस्त वाढवावी, जेणेकरून अशा एखाद्या तरुणाचा जीव जाऊ नये. पालकांनीही याकडे लक्ष द्यावे. -मनोज भिसे, लोकहित मंच, सांगली

Irwin bridge in Krishna River flood
300 फूट उंचीवरून कोसळणारा 'हा' धबधबा पर्यटकांना लागला खुणावू; चांदोलीतील धबधब्यांची पर्यटकांना साद

स्टंटबाजी नव्हे; परंपरा

सांगलीच्या कृष्णामाईच्या पात्रामध्ये पोहणे, आयर्विन पुलावरून पुरात उड्या मारणे, हे नदीकाठी राहणाऱ्या तरुणांचे स्वप्न असते. कारण जोपर्यंत कृष्णामाईच्या अथांग अशा वाहत्या पाण्यात पोहत नाही, तोपर्यंत महापुरात लोकांचा जीव वाचविण्यासाठी सराव होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रशासन, सामाजिक कार्यकर्त्यांनी हे समजून घ्यावे की, पुरात उड्या मारणे, पुरात पोहणे, होड्या चालविणे, होड्यांच्या स्पर्धेत भाग घेणे ही सगळी स्टंटबाजी नसून ही आमची परंपरा आहे.

ही परंपरा आमच्या पूर्वजांनी जपली होती. आता नवीन पिढी म्हणून ही परंपरा जपणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही ही परंपरा जपली नसती, तर 2005, 2019 आणि 2021 च्या महापुरामध्ये आम्हाला सांगलीकरांचा जीव वाचविता आला नसता, तसेच प्रशासनाला ही मदत करता आली नसती. सांगली शहरामध्ये आणि सांगलीवाडी, तसेच नदीकाठच्या प्रत्येक गावामध्ये जिगरबाज तरुण आहेत. त्यामुळेच महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा जीव वाचविता येतो. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात घेऊन ही परंपरा टिकविली पाहिजे, वाढविली पाहिजे. समजा ही परंपरा संपली तर भविष्यात आपल्याला बाहेरील मदतीवर अवलंबून राहावे लागेल. वस्तुस्थिती समजून घ्यावी.

-ॲड. अमोल बोळाज, रॉयल कृष्णा बोट क्लब, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

dead chickens thrown from bypass bridge in Sangli
Nrusinhawadi Datta Temple darshan after flood
The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.
Man Falls into Overflowing Krishna River; Swift Police Action Saves His Life
Marathi News Esakal
www.esakal.com