सोलापूर झेडपीत काँग्रेसने का घेतली माघार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

काँग्रेसच्या या खेळीमुळे आश्चर्य व्यक्त होत असून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी करणाऱ्या तीन सदस्यांना पक्षाकडून जीवनदान मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी सभापती मल्लीकर्जून पाटील व नागणसूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शीलवंती भासगी यांना अपात्र करावे, अशी मागणी यांचे जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे गटनेते संजय गायकवाड यांनी केली होती.

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी करणाऱ्या सदस्यांना अपात्र करावे अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसने तीन सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला अर्ज आज माघारी घेतला आहे. 
काँग्रेसच्या या खेळीमुळे आश्चर्य व्यक्त होत असून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी करणाऱ्या तीन सदस्यांना पक्षाकडून जीवनदान मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी सभापती मल्लीकर्जून पाटील व नागणसूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शीलवंती भासगी यांना अपात्र करावे, अशी मागणी यांचे जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे गटनेते संजय गायकवाड यांनी केली होती. जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे आज सुनावणी सुरू होण्यापूर्वीच हा अर्ज मागे घेतला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांनी स्थापन केलेले महाविकास आघाडीचा पॅटर्न चालला नाही. सर्वात जास्त सदस्य असून सुद्धा राष्ट्रवादीला येथे अध्यक्षपद मिळवता आले नाही. या जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या पाठींब्याने शिवेसेनेचे अनिरुद्ध कांबळे हे अध्यक्ष झाले आहेत. शिवसेना व भाजप यांचे सध्या जमत नसले तरी शिवसेनेच्या उमेदवाराला अध्यक्ष करण्यासाठी येथील भाजपने पाठिंबा दिला. याबरोबर समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत व परिचारक यांच्या समर्थक सदस्यांनीही भाजपला पाठिंबा दिल्या. त्यामुळे कांबळे यांची अध्यक्ष म्हणून वर्णी लागली. निवडणुकीवेळी काँग्रसेच्या सदस्यांनीही त्यांना मतदान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी काँग्रेसने अर्ज दाखल केला होता. आज त्याची सुनावणी होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांना अर्ज मागेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Solapur Zp Congress Withdraws