अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

घटनेनंतर मल्लाप्पा पाटील जत पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने खुनाची कबुली दिली, अशी माहिती जत पोलिसांनी दिली. याबाबत जत पोलिस ठाण्यात कस्तुरी यांचा भाऊ शिवाण्णा कल्लाप्पा महालिंगवब (रा. कोट्टलगी, विजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. जत पोलिसांनी संशयित मल्लाप्पा पाटील याला अटक केली. 

जत ( सांगली ) - तालुक्यातील बिळूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कस्तुरी मल्लाप्पा पाटील (वय 45 ,रा. बिळूर, ता. जत) असे मृत महिलेचे नाव आहे. आज सकाळी सातच्यापूर्वी हा प्रकार घडला.

घटनेनंतर मल्लाप्पा पाटील जत पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने खुनाची कबुली दिली, अशी माहिती जत पोलिसांनी दिली. याबाबत जत पोलिस ठाण्यात कस्तुरी यांचा भाऊ शिवाण्णा कल्लाप्पा महालिंगवब (रा. कोट्टलगी, विजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. जत पोलिसांनी संशयित मल्लाप्पा पाटील याला अटक केली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - 

बिळूर गावापासून काही अंतरावर असणाऱ्या नागझरी वस्तीवर पाटील कुटुंबीय राहायला आहेत. मल्लाप्पा व कस्तुरी यांच्या मध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून सतत वाद झाले होते. वादामुळे पत्नी गेल्या दीड वर्षांपासून माहेरी कर्नाटकातील कोट्टलगी गावी रहात होत्या. या दाम्पत्यास संजय व सिद्धगोंडा अशी दोन मुले आहेत. 

जुन्या कारणावरून वाद 

दरम्यान, दोघा मुलांनी आई-वडील या दोघांमधील अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आणला व चार महिन्यांपूर्वी कस्तुरी सासरी बिळूर येथे एकत्रित राहण्यासाठी आल्या होत्या. यातूनही दोघांमध्ये सतत वाद निर्माण झाले होते. 
आज पहाटे तीनच्या सुमारास मल्लाप्पा पाटील आणि पत्नी कस्तुरी यांच्यात घरात बिळूरमध्ये त्याच जुन्या कारणावरून वाद झाला. यातूनच पती मल्लाप्पा याने पत्नी कस्तुरी यांचा गळा आवळून खून केला. पोलिस निरीक्षक आर. आर. शेळके तपास करत आहेत. 

आठवड्यात तिसरा खून 

जत तालुक्‍यात सलग तीन खून झाले. ता. 5 डिसेंबरला दोघा पुतण्याकडून काकाचा, तर ता. 6 रोजी मुलाने पैशासाठी आईचा भोसकून खून केला. आज सोमवारी एकाने पत्नीचा गळा आवळून खून केल्याने तालुक्‍यात पोलिसांची तारांबळ उडाली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wifes Murder Over Suspicion Of Immoral Relationship