
सलगर बुद्रुक : मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील सलगर बुद्रुक येथे सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत विस्तारलेल्या घनदाट अश्या सलगर बुद्रुक वनविभागात ऐन उन्हाळ्यात पाण्यावाचून वन्यजीवांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत.याला सर्वस्वी वनविभाग जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.