संजय शिंदे विधानसभेच्या रिंगणात उतरणार का?

अण्णा काळे 
रविवार, 8 सप्टेंबर 2019

करमाळ्यातील संजय शिंदे यांचे कार्यकर्ते सध्या शांत आहेत. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे हे निवड लढणार की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

करमाळा (जि. सोलापूर) : लोकसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर लगेचच करमाळा तालुक्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढवलीच पाहीजे म्हणून आग्रह धरला. मात्र गेल्या महीनाभरापासून करमाळ्यातील संजय शिंदे यांचे कार्यकर्ते शांत आहेत. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे हे निवड लढणार की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

लोकसभेसाठी भाजपकडून ऑफर असतानाही संजय शिंदे हे राष्ट्रवादीकडून लढले आणि पराभूत झाले. संजय शिंदे लोकसभा निवडणूक लढवत असल्याचा सर्वाधिक आनंद बागल गटाला झाला. विधानसभेला शिंदेची मदत होईल अशी त्यांची अपेक्षा होती. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता संजय मामा विधानसभा निवडणूक लढवणार असा निशाना साधत रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र त्यानंतर बागलांनी पक्ष प्रवेशाची घाई केल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले आहे. 

आता राष्ट्रवादीची उमेदवारी संजय मामा शिंदे यांना मिळणार अशी ही चर्चा रंगली. मात्र सद्यस्थिती संजय शिंदे काय करणार आहेत. याचा कोणालाच अंदाज येईना असा झाला आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे भाजप प्रवेशाचे ठरले असल्याचेही बोलले जात आहे. संजय शिंदे यांना भाजप प्रवेश दिला जाणार का?या विषयी ही उत्सुकता लागली आहे.
वास्तविक पाहता संजय शिंदे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक बोलले जाते आहे. त्यामुळे ते युतीच्या निर्णयाची वाट पहात आहेत.

त्यामुळे सध्या संजयमामाची भुमीका वेट अ्ॅण्ड वाॅच अशीच आहे. परिणामी करमाळा तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते ही शांतच आहेत. याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारले असता मामांचा लवकरच निर्णय होणार आहे असे सांगत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Sanjay Shinde land in the assembly election?