
सांगली प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी बॅंकेतील विरोधी शिक्षक संघाचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी धडपड करत आहेत.
सांगली ः राज्यातील 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी बॅंकेतील विरोधी शिक्षक संघाचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी धडपड करत आहेत. संघाचा शि. द. पाटील गट आणि थोरात गट एकत्र येऊन सत्ताधारी शिक्षक समितीला आव्हान देणार आहेत.
शिक्षक बॅंकेची निवडणूक जवळपास एक वर्ष लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सत्ताधारी शिक्षक समितीला हा अधिकचा कालावधी मिळाला आहे. सहाजिकच, या काळात बरीच उलथापालथ झाली आहे. समितीला मतदार बांधण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्याचवेळी शिक्षक संघालाही परिस्थितीचा फायदा घेत एकमेकांशी जुळवून घेण्याची संधी मिळाली आहे. तिरंगी लढत झाली तर हाती काहीच लागत नाही, याची जाणीव संघाला गेल्या निवडणुकीतच झाली होती. त्यामुळे यावेळी शि. द. पाटील गट दोन पावले मागे जावून तडजोडीच्या भूमिकेत येऊ लागला आहे.
त्याआधी या गटातच दुफळी माजली होती. शि. द. पाटील यांचे चिरंजीव माधवराव पाटील आणि नातू शंभोराज पाटील यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. त्यामुळे "जुळता-जुळता राहिलयं' अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात आता सुधारणा करण्यात येत आहे. त्यानंतर समितीशी लढण्यासाठी जे काही करायला लागेल ते करू, असा निर्धार राज्याच्या नेत्यांनी केला आहे. थोरात गट त्याला कसा प्रतिसाद देतोय, याकडे लक्ष असणार आहे.
शिक्षक बॅंकेत पुढेही सत्ता कायम राखण्यासाठी समितीकडून पूर्ण ताकद लावण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात वाढवलेले सभासद त्यांच्या पथ्यावर पडतील, असा त्यांना विश्वास आहे. गेल्या पाच वर्षांतील कारभाराबाबत विरोधकांनी टीका केलीय आणि सत्ताधाऱ्यांनी बचावही केला आहे. ते मुद्दे चर्चेत राहणारच आहेत, मात्र बेरजेच्या राजकारणावर
संपादन : युवराज यादव