सांगली : तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात एका शेतकरी कुटुंबात (Farmer Family) मागील आठ ते नऊ महिन्यांपासून अचानक घरातील कपडे आपोआप पेटू लागले, अंगणात रचून ठेवलेल्या कडब्याची गंजी पेटू लागली, हे अचानक काय व्हायला लागले म्हणून ते कुटुंब भयभीत झाले. त्याने तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. तासगाव पोलिसांनी (Tasgaon Police) अंधश्रद्धेचा प्रकार आहे, त्यामुळे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सल्ला घ्या, असे सांगितले.