
विटा : लेंगरे (ता. खानापूर) येथे गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातातील जखमी विजया रवींद्र शिंदे (वय ४५, जोंधळखिंडी, ता. खानापूर) या महिलेचा रविवारी रात्री उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात ५ एप्रिलला दुपारी दीडच्या सुमारास लेंगरे (ता. खानापूर) गावच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेसमोर असलेल्या डांबरी रस्त्यावरील गतिरोधकावर झाला होता.