esakal | 'सांगलीकरांनो मास्क वापरा'; स्मृती मानधनाचे आवाहन

बोलून बातमी शोधा

'सांगलीकरांनो मास्क वापरा'; स्मृती मानधनाचे आवाहन
'सांगलीकरांनो मास्क वापरा'; स्मृती मानधनाचे आवाहन
sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज आणि सांगलीची सुकन्या स्मृती मानधना हीने आज एका 'व्हीडीओ' द्वारे सांगलीकरांना कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. सांगलीकरांनी प्रशासनाला साथ देऊन कोरोना फैलाव रोखावा अशी सूचनाही केली.

स्मृती मानधना म्हणाली, 'माझ्या सर्व सांगलीकरांना मी नम्रपणे आवाहन करते, सध्या कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कोरोनाच्या लाटेला थोपवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आजही अनेकजण अनावश्यक बाहेर पडतात. अनेकजण मास्कचा वापर व्यवस्थितपणे न करता मास्क गळ्यात अडकवताना दिसतात. चला, आज आपण सगळे निश्‍चय करूया. 'मी जबाबदार, मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार कोरोनाला हरवणार.' मी मास्कचा योग्य पध्दतीने वापर करणार, वारंवार हात धुणार, सॅनिटायझरचा वापर करणार, सामाजिक अंतर पाळणार, कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरीत नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधणार आणि कोरोनावर मात करणार. आपण सुरक्षित तर देश सुरक्षित. चला, प्रशासनाला साथ देऊ कोरोना फैलावण्यापासून रोखू.'

हेही वाचा: शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षणातून वगळले; राज्य सरकारने केली निर्णयात दुरुस्ती