
मिरज : जगभरात आज महिलांच्या सन्मानासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच महिला सन्मानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातर्फे संपूर्ण पोलिस ठाण्यातील कामकाजाची जबाबदारी महिलांच्या हाती सोपवण्यात आली होती. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.