तहसीलदाराच्या चारित्र्याची महिलाच करणार चौकशी 

Women will inquire into Tehsildar's character
Women will inquire into Tehsildar's character

नगर : महिला तलाठी, कर्मचाऱ्यांशी अश्‍लील वर्तन केल्याचा आरोप असलेले शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांच्या चौकशीसाठी समिती नेमली असून, समितीला तत्काळ चौकशीचा आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज सांगितले. या समितीत पाच महिला सदस्यांचा समावेश असेल. 

तहसीलदार भामरे यांच्यावर कार्यालयातील महिलांशी अश्‍लील वर्तणूक केल्याचा आरोप आहे. त्यांच्याबाबत जिल्हाभर संतापाची लाट आहे. त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी, अशी मागणी महसूल कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी समिती नेमण्याचा आदेश दिला. महसूल कर्मचारी संघटनेचे रावसाहेब निमसे, तलाठी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हातारदेव सावंत, जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भुजबळ, भाऊसाहेब डमाळे, कैलास साळुंके यांनी हे निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे, की शेवगाव तालुक्‍यातील महिला तलाठी, कर्मचाऱ्यांशी तहसीलदार भामरे अश्‍लील वर्तणूक करत आहेत. या संदर्भात शेवगाव तालुका तलाठी, कर्मचाऱ्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यातर्फे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही नुकतेच निवेदन दिले होते. तहसीलदार स्वत:ला वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दडपण टाकीत आहेत. त्यामुळे आधी त्यांना पदावरून हटविण्यात यावे, त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी आणि नियमानुसार कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. 

शेवगाव तहसीलदार भामरे यांच्याविरोधात आलेल्या निवेदनाबाबत शासन निर्णय कलम 4 (1) व कलम 6 (1) नुसार जिल्हास्तरावर नेमलेली समितीच चौकशी करील. समितीत पाच महिला सदस्यांचा समावेश असेल. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी समितीच्या सदस्य सचिव आहेत. समितीला तत्काळ चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

तत्काळ कारवाई करा; अन्यथा मोर्चा 
शेवगाव तहसीलदाराने महिला कर्मचाऱ्यांशी अश्‍लील वर्तणूक करून मानसिक त्रास दिला. त्यावर तातडीने कारवाई करावी; अन्यथा महसूल अधिकाऱ्यांविरोधात नगर ते मंत्रालय (मुंबई) मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

शिवसेना महिला आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 
तहसीलदार विनोद भामरे यांची सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे, की तहसीलदार भामरे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी अश्‍लील वर्तन करतात. त्यांना केबिनमध्ये बोलावून तासन्‌ तास ताटकळत उभे केले जाते. दैनंदिन कामाव्यतिरिक्त खासगी व कौटुंबिक आयुष्याविषयी प्रश्न विचारून अश्‍लील चर्चा व शेरेबाजी करत, शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करतात. किरकोळ कामाचे निमित्त काढून दुसऱ्यांच्या मोबाईलवरून महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून घेतात. हा प्रकार निंदनीय असून, तो मिटविण्यासाठी शहरातील विविध संघटना व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते "अर्थ'पूर्ण मध्यस्थीचा प्रयत्न करत आहेत. निवेदनावर शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख जया जाधव, जिल्हा समन्वयक एकनाथ कुसळकर, तालुकाप्रमुख भरत लोहकरे, शहरप्रमुख सुनील जगताप आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला आयोग, जिल्हाधिकारी आदींना पाठवण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com