दुर्दैव : गवत आणण्यासाठी शेतावर ती गेली अन्....

अमृत वेताळ
Monday, 3 August 2020

दरम्यान मरणहोळ गावातील मलप्रभानदीच्या काटावर असलेल्या शेतातील गवत आणण्यासाठी गेली होती.

बेळगाव : गवत आणण्यासाठी शेतावर गेलेल्या महिलेचा घटप्रभा नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. 2) मरणहोळ ता. बेळगाव) येथे ही घटना उघडकीस आली असून घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात झाली आहे. निर्मला परशु येमेटकर (वय 30, रा. मरणहोळ) असे मयत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा- ...तरच कोल्हापुरातील कोरोना रूग्णांची संख्या होईल कमी -

याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी,

निर्मला ही 30 जुलै रोजी सकाळी 9 ते रविवारी 2 सकाळी 10 या दरम्यान मरणहोळ गावातील मलप्रभानदीच्या काटावर असलेल्या शेतातील गवत आणण्यासाठी गेली होती. गवत कापत असताना पाय घरून ती नदीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.

हेही वाचा- इचलकरंजीत रुग्णसंख्या हजारच्या पुढे ; मृतांचे अर्धशतक पार -

घटनेची माहिती समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तिच्या मृत्यूबद्दल कोणताही संशय नसल्याचे कुटुंबीयांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. या प्रकरणी सतूराम भागोजी पाटील (रा. मरणहोळ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हल्लूर अधिक तपास करीत आहेत.

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women woman who went to the field to fetch hay Ghatprabha drowned in the river