
आटपाडी : देशातील पहिल्या बंदिस्त पाईपने शेतीला पाणी देणाऱ्या टेंभूच्या पथदर्शी प्रकल्पाचे काम धिम्या गतीने, संथ आणि विस्कळित पद्धतीने चालू आहे. संथ गती, वर्षभर शेतात खोदून ठेवलेल्या चरी, शेतकऱ्यांच्या तक्रारी, बांधावर, तलाव आणि बंधाऱ्यात गरजेच्या ठिकाणी आऊटलेट न काढणे, चुकीच्या कामामुळे झालेले अपघात या साऱ्या सावळ्या गोंधळामुळे प्रकल्पाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे. त्यामुळे देशातील पहिल्या बंदिस्त पाईपलाईन पथदर्शी प्रकल्पाच्या यशस्वितेवर प्रश्न निर्माण होणार आहे.
टेंभू योजनेतून दुष्काळी भागातील तालुक्याला पाणी दिले जाते. यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि डॉ. भारत पाटणकर यांनी अनेक वर्षे लढा दिला. सर्वसामान्य शेतकरी ते लोकप्रतिनिधी, मंत्री या सर्वांनी योगदान दिले. त्यामुळे पाणी आले. मुख्य कालव्यातून पाणी ओढ्यानी तलावात सोडले जाते. पोट कालव्याची गरज होती. त्यासाठी भूसंपादन आणि इतर समस्या होत्या. त्यामुळे शासनाने टेंभूचे पाणी शेताला बंदिस्त पाईपलाईनने देणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाला मंजुरी दिली. मुंबईतील एका नामवंत कंपनीने कामाचा ठेका घेतला. या कंपनीच्या मिरज येथील युनिटने स्वतः काम न करता उपठेकेदार नेमले. त्यांच्याकडून दोन वर्षेपासून अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे.
दर्जावरही प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात चरी खोदून तशाच ठेवल्या आहेत. काही ठिकाणी पाईप टाकल्या पण चरी बुजवल्या नाही. शेतकऱ्यांच्या शेतात तसेच मोठ मोठे दगड पडून आहेत. बंद पाईप उंच ठिकाण असलेल्या माथ्यावरून जाणे अपेक्षित आहे. तरच सर्वठिकाणापर्यंत पाणी पोहोचणार आहे. त्यादृष्टीने शासनाने केलेल्या आराखड्या प्रमाणे काम केलेले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार आहेत. तसेच पाईपच्या आउटलेट शेतकऱ्यांच्या बांधावर, तलाव आणि बंधाऱ्याच्या ठिकाणी असणे गरजेचे असताना शेतकऱ्याच्या शेतात मध्यवर्ती ठिकाणी काढले आहेत. आउटलेट व एअर व्हॉल्व्ह काढताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे भविष्यात या ठिकाणाहून पाणी नेताना वाद निर्माण होणार आहेत.
अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूपर्यंत पाईपा आणून सोडल्या. डांबरीकरणाचे काम करण्याअगोदरच पाईप टाकणे गरजेचे होते. तसे ठेकेदाराला कळवले मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. रस्त्याचे काम झाल्यावर जागोजागी डांबरी रस्ते खोदाई करून पाईप नेल्या आहेत. त्यामुळे रस्ते खराब झाले असून खोदलेल्या ठिकाणी मोठे उंचवटे केलेत. यामुळे दोन दिवसांपूर्वी शेटफळे रस्त्यावर अपघात होऊन एक महिला गंभीर जखमी झाली. अशी ठिकाणे अपघाताला निमंत्रण देणारी आहेत. यासंबंधी अनेकांनी कंपनीकडे चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात तर अनेक वेळा फोन उचलले जात नाहीत. या साऱ्यामुळे पथदर्शी प्रकल्पाच्या यशस्वितेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
शासनाने ज्या उद्देशाने बंदिस्त पाईपलाईन पथदर्शी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आहे. त्याप्रमाणे अपेक्षित गतीने काम चालू नये. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- आनंदराव पाटील, नेते श्रमिक मुक्ती दल.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.