
कुपवाड : दत्तनगर बामणोली (ता. मिरज) येथील ट्रान्स्फाॅर्मर रिपेरिंग वर्कशॉपमध्ये विजेचा झटका बसल्याने जितेंद्र तायाप्पा सूर्यवंशी (वय ५५, सध्या रा. रोहिदास गल्ली, कुपवाड) कामगार ठार झाले. रविवार (ता. २७) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली. घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.