जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यासमोरच्या खड्डयात प्रतिकात्मक पूजा 

अजित झळके  
Wednesday, 23 September 2020

विश्रामबाग येथे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यासमोर आज प्रतिकात्मक पुजा करण्यात आली. दलित महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

सांगली : विश्रामबाग येथे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यासमोर आज प्रतिकात्मक पुजा करण्यात आली. दलित महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या खड्ड्यात पडून कुणाचा प्राण जावू नये, अशी प्रार्थना करण्यात आल्याचे मोहिते यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्ते चकचकीत करण्याचे वचन दिले होते. गेल्या सत्ता काळात राज्य सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी रस्ते कामासाठी दिल्याचे सांगण्यात आले. 

तरीही शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष हे भाजपचेच आहेत, त्यांच्या बंगल्यासमोर मोठा खड्डा पडलाय. तोही भरून घेतला जात नसेल तर गंभीर आहे. कोविडचे कारण सांगून महत्वाची कामे टाळली जात आहेत. या रस्त्याची कामे होत नसतील तर मग इतर कामे कशी सुरु आहेत. 

अनेक ठिकाणी ड्रेनेजसाठी रस्ते उकरले आहेत. त्याला मंजुरी आहे का? मग असे खड्डे मजुवायला नियम आडवा येतो काय? या खड्डात कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण?'' यावेळी धमेंद्र कोळी, अरुण चव्हाण, वनिता कांबळे, गणेश भोसले, रामभाऊ पाटील, सुरेखा मोरे, राजेश कुरणे आदी उपस्थित होते. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worship in the pit in front of the zp President's bungalow