दानशूरांच्या मदतीमुळे वाचले यशचे प्राण

अमोल वाघमारे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सावळीविहीर (नगर) : खेळण्या-बागडण्याच्या वयात आजाराने ग्रासले, घरची परिस्थिती गरिबीची, मेंदुवरील शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मी रिक्षा चालवुन किती पैसे गोळा करणार? म्हणुन मदतीचा हात मागितला आणि काही दिवसांत मुलासाठी मिळालेल्या मदतीतून यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आपण चांगले तर, जग चांगले याची प्रचिती आली. देणाऱ्याचे हात हजारो प्रमाणे लोकांनी मदत केली म्हणुन आज मी माझा मुलगा पाहतो आहे, अशी बोलकी प्रतिक्रीया चंदकांत ससाणे यांनी दिली.

निमगाव (ता.राहाता) येथील रिक्षा चालक चंद्रकांत ससाणे यांचा इयत्ता दुसरीत शिकणारा यश (वय-10 वर्षे) या चिमुकल्यास एपिलेप्सी (फिट येणे) या आजाराने वयाच्या पाचव्या वर्षापासुन ग्रासले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने चंद्रकांत यांनी जवळपास अनेक छोट्या-मोठ्या रुग्णालयात उपचार केले. परंतु आजार वाढत गेल्याने चंद्रकांत यांची चिंता वाढत होती.

शेवटी काही महिन्यांपूर्वी यशचे त्वरीत ऑपरेशन करण्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि पुढील उपचार हे पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेण्याचे ठरले. ऑपरेशनसाठी तीस दिवसांत सुमारे 2 लाख 50 हजार रुपये डॉक्टरांनी सांगितले. प्रथम चंद्रकांत यांच्या पायाखालची जमिनच सरकली परंतु मित्रांनी आणि नातेवाईकांनी धीर दिल्याने चंद्रकांत यांना सावरण्यात यश आले.

चंद्रकांत यांनी अनेक ठिकाणी मदतीसाठी धाव घेतल्याने त्यांना काही दिवसांत पैशांची व्यवस्था झाल्याने यशचे मेंदुवरील अवघड ऑपरेशन करण्यात डॉक्टरांना यश आले. पुणे येथील मुकुल माधव फौंडेशन, मुख्यमंत्री निधी, निमगाव ग्रामपंचायत, शिर्डी येथील चावडी कट्टा, सावळीविहीर येथील हेल्पींग हॅण्ड, निमगावसह परिसरातील तरुण मंडळे, साईनगर शिर्डी परिसरातील रिक्षा चालक, निमगाव येथील दानशुर व्यक्ती यांनी केलेल्या मदतीमुळेच मुलाचे प्राण वाचले असे मत चंद्रकांत यांनी व्यक्त केले.

काल यश आपल्या आई वडीलांसह घरी परतला. 75 टक्के मतिमंद असलेल्या यशसाठी मिळालेली ही सेंकड लाईफ ही जगातील अनमोल भेट असल्याचे शेवटी ससाणे यांनी सांगितले.
 
Web Title: yash becomes saved due to big help from others