कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात स्थान देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी बरेच प्रयत्न केले; पण स्थानिक नेते मंडळींनी त्याला साथ दिली नाही.
निपाणी : देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Jayanti) यांनी महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली. सीमाभागात मराठी भाषिक विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन त्यांच्यासाठी महाराष्ट्रात नवीन अध्यादेश काढून त्यांना शैक्षणिक दालने खुली करून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन येथील नगरपालिकेतर्फे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांच्या पुढाकाराने १ सप्टेंबर २०१७ रोजी येथील मुरगूड रस्त्यावर त्यांचा पुतळा बसवून स्मारक उभे केले आहे.