esakal | गोंधळेवाडीत यात्रा रद्द झाली; यात्रा कमीटीने केला हा संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

Yatra canceled at Gondhalewadi; This good thing carried out by the orgnisining Committee

जत तालुक्‍यातील गोंधळेवाडी येथील श्री मरगम्मा देवीच्या यात्रेनिमित्य गावात तसेच रस्त्याकडेला पाचशे झाडे लावण्याचा संकल्प गोंधळेवाडी येथील श्री मरगम्मा देवी यात्रा कमेटीने केला आहे.

गोंधळेवाडीत यात्रा रद्द झाली; यात्रा कमीटीने केला हा संकल्प

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

संख ः जत तालुक्‍यातील गोंधळेवाडी येथील श्री मरगम्मा देवीच्या यात्रेनिमित्य गावात तसेच रस्त्याकडेला पाचशे झाडे लावण्याचा संकल्प गोंधळेवाडी येथील श्री मरगम्मा देवी यात्रा कमेटीने केला आहे. कमेटीच्या या निर्णयाचे स्वागत करत चिकलगी मठाचे मठाधिपती, ज्येष्ठ समाजसेवक तुकाराम बाबा महाराज यांनी वृक्षारोपणासाठी यात्रा कमेटीला 500 झाडे देण्याचे जाहीर केले. 

यात्रेचे निमित्य साधून गोंधळेवाडीत वृक्षारोपणाला ही सुरुवात करण्यात आली. चिकलगी मठाचे मठाधिपती, ज्येष्ठ समाजसेवक तुकाराम बाबा महाराज, मुंबईचे पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. 

जत पूर्व भागात गोंधळेवाडी येथे श्री मरगम्मा देवीची यात्रा दरवर्षी मोठया उत्साहात साजरी करण्यात येते. मुंबई, पुणे सह कर्नाटकातुनही मोठ्या संख्येने भाविक यात्रेला येतात. यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी यात्रा काळातील धार्मिक विधी पाच जणांच्या प्रमुख उपस्थिती नित्य नियमाने पार पाडले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत सर्व विधी पार पाडले जात आहेत. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते परशुराम दोरकर, मुंबईचे पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर, प्रहार संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत, अँड. हिरालाल धुमाळ, प्रफुल दोरकर, अप्पासाहेब भोसले ,भैय्यासाहेब भोसले, सतीश भोसले , प्रेमदास भोसले 

मऱ्याप्पा धुमाळ , धनाप्पा राठोळ, गोंधळी समाज संघटनेचे सिद्राया मोरे गोंधलेवाडी, अंकुश धुमाळ ,रेवण वाघमोडे, संजय दोरकर , मोहन धुमाळ , शिवसेनेचे जत तालुका संपर्क प्रमुख गणेश टोणे, सिद्राया मोरे पोलीस पाटील अविनाश धुमाळ, दत्ता सावळे, विलास दोरकर , जयदीप मोरे आदी उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव