यंदा गणेशोत्सवावर  कोरोनाचे सावट 

पोपट पाटील 
Friday, 10 July 2020

इस्लामपूर (सांगली) ः अवघ्या महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळांकडून अद्याप एकाही मुर्तींचे बुकींग झालेले नाही. त्यामुळे कोरोना महासंकटाचे पडसाद गणेशोत्सवावर उमटणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र यामुळे गणेश मुर्तीकार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 

इस्लामपूर (सांगली) ः अवघ्या महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळांकडून अद्याप एकाही मुर्तींचे बुकींग झालेले नाही. त्यामुळे कोरोना महासंकटाचे पडसाद गणेशोत्सवावर उमटणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र यामुळे गणेश मुर्तीकार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 

तालुक्‍यातील प्रत्येक गावात लहान मोठ्या गणेश मूर्ती तयार होतात. यंदा सार्वजनिक मंडळांकडून गणेश मुर्तींची मागणी घटली आहे. शिवाय साधेपणाने उत्सव साजरा होणार असल्याने मुर्तींची उंची कमी होणार आहे. लॉकडाऊमुळे आधीच अडचणीत आलेले मुर्तीकार मागणी कमी झाल्याने हवालदिल झाले आहेत. 

एरवी दरवर्षी महिनाभर आधी सर्व मुर्त्यांचे बुकींग पुर्ण होते; मात्र यावर्षी अद्याप एकाही मुर्तीचे बुकींग झालेले नाही. मुर्तीकारांचा रोजगारच कोरोनाने हिरावुन घेतल्याचे चित्र आहे. मुर्तीसाठी रंग व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात मुंबई, परराज्यातून खरेदी केले जाते. मार्च पासून लॉकडाऊन सुरु झाल्याने मूर्तिकारांना हे साहित्य आणणे शक्‍य झालेले नाही.

शासनाने या वर्षी गणेशोत्सवा मध्ये मोठ्या गणेश मूर्तीना परवानगी नाकारली आहे. उत्सव नेमका कशा प्रकारे साजरा होणार याची अजूनही स्पष्टता झालेली नाही. यामुळे मोठ्या मूर्तींना मंडळाकडून अजूनही मागणी आलेली नाही. मूर्तीसाठी लागणारे साहित्य लॉकडाऊन मुळे पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने घरगुती मूर्तींचे कामही संथ गतीने सुरु आहे.

वाढती महागाई आणि लॉकडाऊनमुळे मूर्तीसाठी आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी मूर्तिकारांकडे भांडवल कमी आहे. त्यांना बॅंका आर्थिक सहकार्य करु शकत नाहीत. यामुळे हा व्यवसाय अडचणीच्या मार्गावर येऊन थांबलेला आहे. शासनाने मूर्तिकाराना मदत करावी अशी मागणी होत आहे. 

कोट 

"" प्रत्येक वर्षी गणेश मंडळाकडून दोन महिने अगोदरच मोठ्या मूर्तींचे बुकिंग होते. सरासरी 9 हजार रुपये प्रमाणे 50 ते 55 मूर्त्यांचे बुकिंग केले जाते. 3 ते 4 लाखाची उलाढाल दर वर्षी होते. त्यावर वर्षभराचा कुटुंबाचा खर्च चालतो. या वर्षी कोरोनामुळे अद्याप मोठ्या मंडळाकडून मूर्तींना मागणी नसल्याने आर्थिक गणित विस्कटलेले आहे. मूर्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध आणण्यात अडचणी आहेत. 

शरद शिवाजी कुंभार 
मुर्तीकार, इस्लामपूर. 
-------- 

संपादन ः अमोल गुरव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year, corona savat on Ganeshotsav