यंदा गावरान आंबा बहरलाच नाही 

KOP20J58718_pr.jpg
KOP20J58718_pr.jpg
Updated on

पेड (सांगली) : बदलत्या वातावरणामुळे या वर्षी कमी प्रमाणात पडलेली थंडी, अवेळी पडलेला पाऊस, किडींचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गावरान आंब्याचे उत्पादन कमी येणार असल्यामुळे अक्षय तृतीयाला आमरस मिळणे अवघड बनले आहे. 

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षयतृतीया होय. हिंदू संस्कृतीमध्ये या दिवशी आंब्याच्या रसाला खूप महत्त्व आहे. याच दिवशी आंब्याचे पूजन केले जाते. मात्र यावर्षी हवामान बदलामुळे लांबलेली थंडी, अवेळी पाऊस, सातत्याने येणारे ढगाळ हवामान यामुळे तसेच आंब्याच्या मोहोरावर तुडतुड्या तसेच भुरी रोगाचा झालेला प्रादुर्भाव यामुळे आंब्याचा मोहर पडला असल्याच्या कारणाने आंब्याचे उत्पादन घटणार आहे.

त्यामुळे सर्वसामान्य लोकांना या वर्षी अक्षय तृतीयाला आंब्याच्या रसाची चव चाखता येणार नाही. आमरसा बरोबरच लोणच्यासाठीच्या कैरीचा ही तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. विविध प्रकारच्या आंब्याची लागवड करण्यात येते त्यांना चवीनुसार नावे देण्यात आलेले आहेत. गावरान आंब्यांना खोबऱ्या, केळी, कागदी, शेपू, गोटी, शेंद्री, आंबा गोड असेल तर साखर आंबा आदी या नावाने गावरान आंबा ओळखला जातो.

इतर जातीच्या आंब्यांपेक्षा गावरान जातीच्या आंब्याला मागणी जास्त असते. साधारणपणे अक्षय तृतीया पासूनच बाजारात गावरान आंबे विक्री साठी यायला चालू होतात मात्र यावर्षी झाडांना आंबेत न आल्याने आंबा उत्पादक हवालदिल झाले आहेत. यावर्षी गावरान आंब्याची गोडी चाखायला मिळेल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com