शिक्षक संघाच्या मागणीप्रमाणे  यावर्षी फक्त विनंती बदल्याच - विनायक शिंदे

अजित झळके
Tuesday, 21 July 2020

यावर्षी कोरोना संकटामुळे शिक्षकांच्या केवळ विनंती बदल्या करण्याचा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. शिक्षक संघाने त्यासाठी पाठपुरावा करून श्री. मुश्रीफ यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्याचे हे यश आहे, असे मत संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी व्यक्त केले. 

सांगली ः यावर्षी कोरोना संकटामुळे शिक्षकांच्या केवळ विनंती बदल्या करण्याचा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. शिक्षक संघाने त्यासाठी पाठपुरावा करून श्री. मुश्रीफ यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्याचे हे यश आहे, असे मत संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी व्यक्त केले. 

ते म्हणाले, ""राज्य प्राथमिक शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. "ऑफलाइन' बदल्या करू नयेत, अशी विनंती केली. यावर्षी कोरोना आपत्ती कालावधीत फक्त विनंती बदल्याच कराव्यात, अशी मागणी केली. शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात, अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत यादव, धाराशिवचे अध्यक्ष संतोष देशपांडे आणि मी उपस्थित होतो. या मागणीचा विचार करून श्री. मुश्रीफ यांनी 15 टक्के बदल्याचा आदेश रद्द करून फक्त विनंती बदल्या करण्याची घोषणा केली आहे.'' 

ते म्हणाले, ""शिक्षक संघाने 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयात बऱ्याच त्रुटी असून तो आदेश रद्द करून नवीन शैक्षणिक बदली धोरण अमलात आणावे, अशी मागणी यापूर्वीच केली होती. त्यासाठी शासनाने समिती नेमली, पण अजून नवीन शैक्षणिक बदली धोरण निश्‍चित झाले नाही. कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे यावर्षी फक्त विनंती बदल्याच कराव्यात अशी मागणी केली होती.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year, only the request transfer as per the demand of the teachers' union - Vinayak Shinde