होय... जयंतरावांना आमचं आवतण, शेखर इनामदार : आमचे प्रेम 2008 पासूनचे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत आम्ही 2008 मध्ये महापालिका सत्तेत होतो. त्यांचे आमच्यावर प्रेम आहेच. या मित्रत्वाचा शहर विकासासाठी फायदा होईल. त्यांना महापालिकेत आमचे आवतन असेल. असे भाजपचे महापालिकेचे नेते शेखर इनामदार यांनी स्पष्ट केले. 

सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत आम्ही 2008 मध्ये महापालिका सत्तेत होतो. त्यांचे आमच्यावर प्रेम आहेच. या मित्रत्वाचा शहर विकासासाठी फायदा होईल. त्यांना महापालिकेत आमचे आवतन असेल. असे भाजपचे महापालिकेचे नेते शेखर इनामदार यांनी स्पष्ट केले. 

मिरजेत महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या उद्‌घाटन समारंभात महापौर गीता सुतार यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना शहरांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी महापालिकेत बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यावेळी जयंतरावांनी भाजप नेते शेखर इनामदार व मकरंद देशपांडे यांच्यावर आपले विशेष प्रेम असल्याचे ते त्या बैठकीला हवेत अशी पुर्वअट घातली होती. भाजप गोटात या वक्तव्याची चर्चा झाली होती. 

श्री इनामदार म्हणाले,"" पालकमंत्र्यांशी 2008 पासूनचे मित्रत्वाचे संबंध आहेत. आमच्यावर विशेष प्रेमाचा उल्लेख त्यामुळे आहे. आम्हीही शहराच्या विकासासाठी त्याचा फायदा करून घेऊ. त्यांनी पालिकेत यावे. पालिकेचे शासनाकडील प्रलंबित प्रश्न सोडवावेत. महापूर, कोरोनामुळे महापालिका आर्थिक संकटात आहे. घरपट्‌टी, पाणीपट्‌टी वसूल होत नाही. एलबीटीचे अनुदान कमी झाले आहे. त्यामुळे अधिक निधीसाठी त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes ... Our visit to Jayantarao, Shekhar Inamdar: Our love since 2008