सांगली : समाज माध्यमांवरून मैत्री (Friendship) करून येथील तरुणीस लग्नाचे (Marriage) आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करून १२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishrambag Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित ऋषिकेश ब्रह्मदेव माळी (रा. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.