कैलास याने आपले मोठे बंधू प्रेम यांना शनिवारी (ता. २२) , तर आई-वडिलांना रविवारी (२३) नाणीजला देवदर्शनासाठी जाणार असल्याचे सांगितले होते.
शिराळा : येथील बाह्यवळण रस्त्यावर गोरक्षनाथ मंदिर (Gorakhnath Temple) ते बिऊर दरम्यान असणाऱ्या मोरणा नदीच्या (Morna River) पुलाजवळ पिकअप गाडी व देवदर्शनासाठी निघालेल्या खासगी चारचाकी गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात आयटी अभियंता (IT Engineer) असणारा युवक ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. कैलास ताराचंद चव्हाण (वय ३०, पुणे आळंदी; मूळ वरदडी बुद्रुक, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) असे मृताचे नाव आहे.