भन्नाट : घाणंद मधील तरुण क्वारंटाईन झाला, पण कुठे? 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

घाणंद ( ता. आटपाडी, जि . सांगली) येथील मैसूर-उटी येथून आलेला तरुण चक्क झाडावरती कारण क्वारंटाईन झाला आहे.

झरे : घाणंद ( ता. आटपाडी, जि . सांगली) येथील मैसूर-उटी येथून आलेला तरुण चक्क झाडावरती कारण क्वारंटाईन झाला आहे. मैसूर उटी येथे गलाई व्यवसाय करीत होता दहा दिवसापूर्वी गावी आला त्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले त्या तरुणाला घरातील नातेवाईकांनी एक झोपडी घालून दिली व त्यामध्ये क्वारंटाईन झाल्यावर राहत होता. 

परंतु दिवसभर उन्हाचा तडाखा असल्याने व उखा ड्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे त्या झोपडीमध्ये त्याला उखाणा सहन होईना त्यामुळे त्याने झाडावरती झोपाळा बनवला व तेथे क्वारंटाईन झाला सध्या तो दिवसभर झाडावर थांबतो. व सायंकाळी झोपडीमध्ये थांबतो. 

त्याच्याशी संपर्क साधला असता म्हणाला, झोपडीमध्ये उखडत असल्याने एक दिवस झाडा वरती येऊन बसलो .आणि कल्पना सुचली की येथे झोपाळा बनवूया त्यानंतर एक-दोन दिवसांमध्ये झोपाळा बनवला सध्या घरातील लोक दोरीच्या साह्याने जेवण पाणी झाडावरती देतात आणि मला त्या झोपडी पेक्षा झाडावरच्या झोपाळ्यावर बरे वाटते. झाडावर दिवसभर सावली असते निसर्ग छान दिसतो,सोबत मोबाईल निसर्गरम्य वातावरण असल्याने मान रमते असे म्हणाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young man from Ghanand was quarantined on tree