esakal | सांगलीत तरुणाचा खून 

बोलून बातमी शोधा

sangli murder

सांगली ः येथील वानलेसवाडी हद्दीत पुर्वा हॉटेलमागील एका पत्र्याच्या खोलीत आज सकाळी अकराच्या सुमारास तरुणाच्या डोक्‍यात बांबू घालून खून झाल्याचे खळबळजनक घटना उघडकीस आली. आकाश अशोक शिऱ्यापगोळ (वय 20) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे. त्याचा मित्र शशिकांत अणाप्पा कल्लोळी (18) हा गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात हलवले आहे. 

सांगलीत तरुणाचा खून 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः येथील वानलेसवाडी हद्दीत पुर्वा हॉटेलमागील एका पत्र्याच्या खोलीत आज सकाळी अकराच्या सुमारास तरुणाच्या डोक्‍यात बांबू घालून खून झाल्याचे खळबळजनक घटना उघडकीस आली. आकाश अशोक शिऱ्यापगोळ (वय 20) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे. त्याचा मित्र शशिकांत अणाप्पा कल्लोळी (18) हा गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात हलवले आहे. 

आकाश शिऱ्यापघोळ हा मूळचा गोकाक येथील आहे. एका बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी तो आणि त्याचे वडिल वॉचमन म्हणून काम करतात. आई-वडिल गावी गेले होते. त्यावेळी सात ते आठ जणांनी मध्यरात्री आकाश आणि शशिकांत यांच्यावर हल्ला चढवला. त्यात आकाशच्या डोक्‍यात बांबूने मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

शशिकांत यालाही बेदम मारहाण करण्यात आली. तोही त्याठिकाणी पडला. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आकाश हा मृत अवस्थेत मिळून आला. तर शशिकांत हा जखमी असल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. किरकोळ कारणातून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. दुपारी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गील, पोलिस निरिक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.