Sangli Police : सांगली शहरातील २४ तास वर्दळ असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर आज (ता.२६) सकाळी एसटीच्या धडकेत तरुण एक चिरडून ठार झाली. मृत तरुणी ही शहरालगत असणाऱ्या हरिपूर येथील असल्याचे समजते आहे..महाविद्यालयाला जाताना हा हृदय पिळवटणारा अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.दरम्यान गेल्य तीन दिवसात चौघांचा अपघाती मृत्यू झाला. तीन महिलांचा समावेश आहे. घरात एका मागून एक झालेला घटनांमुळे हळहळ व्यक्त केले जात आहे..Sangli Accident : सुखी संसाराचं देवदर्शन ठरलं अखेरचं, चार चाकीच्या धडकेत शंभर फुटांपर्यंत गाडी गेली फरफटत; बघणाऱ्या प्रत्येकाची हळहळ....२४ तासांत सांगली शहरात दुसरी घटनापतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर आज काळाने घाला घातला. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास विश्रामबाग उड्डाणपुलावर भरधाव डंपरने त्या दांपत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पतीच्या डोळ्यासमोर घडली.पूनम गोविंद नलवडे (२५, रा. कवलापूर, ता. मिरज) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. या अपघातात पती सुशांत जाधव हेही जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरचालकास पकडून चोप दिला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकास ताब्यात घेतले. श्रीकांत नंदकुमार लमाण (रा. जत) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी उशिरा घटनेची नोंद करण्यात आली आहे..पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की दीड वर्षांपूर्वी पूनम आणि सुशांत यांचा विवाह झाला होता. पूनम या विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात काम करत; तर सुशांत हे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामास आहेत. दोघेही दुचाकी (एमएच १०, डीएन ५१००) वरून कामासाठी यायचे. आजदेखील दहाच्या सुमारास ते घरातून निघाले. त्यावेळी साडेदहाच्या सुमारास कुपवाडकडून विश्रामबागकडे येत होते. त्यावेळी पूल चढतानाच मागून भरधाव वेगाने काँक्रिट मिक्सरचा डंपर (एमएच १७, बीडी ९१२२) येत होता. त्याने पाठीमागून जोराची धडक दांमत्याला दिली. यावेळी पूनम या चाकाखाली सापडल्या. त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुशांत हे जखमी अवस्थेत पडले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.