थोरल्याच्या यशापाठी धाकट्याची काठी 

 The younger brother's support for the success of the big brother
The younger brother's support for the success of the big brother
Updated on

नगर : घरी अठराविश्‍वे दारिद्य्र... जिरायत शेती.. दोन मुलांचे शिक्षण करणे जिकिरीचे झालेल्या वडिलांचे छत्र अर्ध्यातच हरपले. मात्र, शिक्षणाची जिद्द होती. धाकटा इंजिनिअर झाला. त्याने कुटुंब सावरलं आणि आता मोठ्याला "पीएसआय' केलं.


ही कथा आहे गुंडेगाव (ता. नगर) येथील बापूराव व सागर गणपतराव हराळ बंधूंची. गुंडेगावपासून चार किलोमीटरवर गणपत हराळ यांचे घर. वडिलोपार्जित दहा एकर जिरायत शेती. त्यावरच कसा तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण सुरू होते. बारावीनंतर बापूरावने "बीएस्सी'ला अहमदनगर महाविद्यालयात प्रवेश घेतला, तर सागरने इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू केले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात असताना, 2012मध्ये वडील गणपतराव यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. हराळ कुटुंब पुरते कोलमडून पडले. त्या वेळी सागर व बापूराव यांच्या आई सुनीता यांनी कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे पेलली. चार गायी सांभाळून दूधव्यवसाय करीत त्यांनी दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. सागरला पुण्यातील कंपनीत नोकरी मिळाली.


बापूरावला लहानपणापासून लष्कराचे वेड होते. 2014मध्ये त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरवातीला वर्ग-चार पदासाठीच्या परीक्षा दिल्या. त्यात यश मिळाल्याने आत्मविश्‍वास दुणावला. मग त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला सुरवात केली. कोणत्याही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात न जाता, नगरला खोलीवर राहून अभ्यास केला. त्या वेळी त्याला लहान भाऊ सागरची पूर्ण साथ मिळाली. अखेर यश दारात आले नि बापूराव "पीएसआय' झाला. 
नगरमध्ये खोलीवर राहून शिक्षण घ्यायचे, तर खायचे काय, असा प्रश्‍न नेहमी पडायचा.

खोलीभाड्यालाच पैसे नाहीत, तर "मेस'ला कोठून देणार, असा प्रश्‍न होता. त्यामुळे बापूरावला गावातून रोज एसटीने डबा पाठवीत होते. आज त्या कष्टाचं चीज झालं. 
- सुनीता हराळ, बापूरावच्या आई 

"एमपीएससी'साठी आईने मोठे पाठबळ दिले. लहान भाऊ सागरने कुटुंबाची जबाबदारी घेऊन साथ दिली. त्यामुळे आज "पीएसआय'च्या परीक्षेत इतर मागास प्रवर्गात राज्यात चौथा क्रमांक मिळाला. 
- बापूराव हराळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com