
विटा : प्रेमसंबंधातून तरुणाने दिलेल्या त्रासाला कंटाळून महिला वाहक अर्चना प्रवीण भोसले (वय ३८, मूळ, बेणापूर - विठ्ठलनगर, ता. खानापूर) यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची फिर्याद मृताचा दीर सतीश दिगंबर भोसले यांनी विटा पोलिसांत दिली. आकाश शंकर चव्हाण (वय ३१, भवानीनगर पाटीलवस्ती, विटा) या संशयितास ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली. आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.