
सांगली : कोयता घेऊन एका तरुणाने पुष्पराज चौकापासून काही अंतरावर असलेल्या दुकांनासमोर सायंकाळी धिंगाणा घालत दहशत माजविली. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरु होता. भीतीने दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली. अखेर विश्रामबाग पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता जप्त केला.