
सांगली : येथील आयर्विन पुलावरून आज सकाळी अकराच्या सुमारास १७ वर्षीय युवतीने उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, पाण्यात पोहणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिला वाचवण्यात यश आले. संबंधित युवतीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबतची स्पष्टता झाली नाही. येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती.