कोल्हापूर : एसटी बस धडकेने अनोळखी तरुण ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - केर्ली (ता. करवीर) फाट्याजवळ आज सकाळी एसटी बस ने दिलेल्या धडकेत अज्ञात तरूण ठार झाला. संबधित तरूणाची अद्याप ओळख पटली नाही. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. 

कोल्हापूर - केर्ली (ता. करवीर) फाट्याजवळ आज सकाळी एसटी बस ने दिलेल्या धडकेत अज्ञात तरूण ठार झाला. संबधित तरूणाची अद्याप ओळख पटली नाही. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. 

पोलिसांनी दिलेली माहिती, कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील केर्ली फाट्याजवळ आज सकाळी नऊच्या सुमारास रत्नागिरी ते लातूर ही एसटी बस येत होती. त्याचवेळी एक अज्ञात तरूण रस्ता ओलांडत होता. त्याला या बसची जोराची धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ परिसरातील नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. जखमी तरूणाच्या डोक्‍यास गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर सीपीआर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Dead in an accident near Kerle Phata