रेल्वेतून पडल्याने युवकाचा मृत्यू 

हरिभाऊ दिघे 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

तळेगाव दिघे (जि. नगर) : नाशिकरोड येथील गुरेवाडी शिवारात अपलाइनच्या रेल्वे लाइनवर धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने जबर मार लागून संगमनेर (जि. नगर) तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाला. शिवाजी ज्ञानदेव भागवत (24) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मंगळवारी (ता.21) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. 
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास काशी एक्स्प्रेसच्या (गाडी नंबर 1508 अप) चालकाने नाशिकरोडचे उपस्टेशन प्रबंधक राजेंद्र गरुड यांना रेल्वे लाइनवरील 188/6 या खांबाच्या अपरोडच्या रेल्वे लाइनच्या बाजूला तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली.

या माहितीनंतर रेल्वे पोलिस व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक मोबाइल व आधार कार्ड आढळून आले. मोबाइल खराब झाल्याने आधारकार्डच्या मदतीने पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेतल्यानंतर मृत्यू झालेला तरुण शिवाजी ज्ञानदेव भागवत असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वेने प्रवास करीत असताना खाली पडून गंभीर जखमी झाल्याने शिवाजी भागवत याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तळेगाव दिघे (भागवतवाडी) येथे शोकाकुल वातावरणात शिवाजी भागवतच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Youth dies after fall in train