
इस्लामपूर : इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठनजीक असलेल्या विष्णुनगर परिसरात मित्रांसमवेत विहिरीवर पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. ओंकार रणधीर माने (वय २०, मूळ डफळापूर, ता. जत, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. घटना समजल्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सला बोलावले होते. मात्र तोवर ओंकारचा मृत्यू झाला होता. इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. राऊत यांनी फिर्याद दिली आहे.